महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आ. बनसोडे यांनी जिल्ह्यातील बहुतांश केंद्राला भेटी दिल्या

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आ. बनसोडे यांनी जिल्ह्यातील बहुतांश केंद्राला भेटी दिल्या

लातूर (एल.पी. उगीले) औरंगाबाद विभागाच्या शिक्षक आमदार निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आ. विक्रम वसंतराव काळे यांना उमेदवारी दिली असून काळे यांच्या प्रचारासाठी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, कॉलेजला भेटी देऊन महाविकास आघाडीचा प्रचार करण्याचा चंग बांधला होता. मतदानाच्या दिवशीही आ. संजय बनसोडे यांनी जिल्ह्यातील बहुतांश मतदान बूथ केंद्राला भेटी देऊन, मतदानाची गती वाढवण्याची कार्यकर्त्यांना सूचना केली. तसेच जास्तीत जास्त मतदान होईल, यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यातून आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे आ. संजय बनसोडे हे गतिमान आमदार राहिले आहेत. त्यांच्या प्रयत्नाला निश्चित यश मिळेल. अशी अपेक्षा मतदारांना आहे. अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

About The Author

error: Content is protected !!