जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व पक्षप्रवेशाने साजरा – संग्राम रोडगे

जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर व पक्षप्रवेशाने साजरा - संग्राम रोडगे

उदगीर(एल.पी.उगीले):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांचा वाढदिवस महाराष्ट्र सैनिकांनी विविध उपक्रमाने साजरा केला. सामाजिक बांधिलकी जपत आपण ज्या समाजात राहतो, त्याचे काहीतरी देणे लागतो. त्याची परतफेड केली पाहिजे. या भावनेने उदगीर मनसेने राधाई ब्लड बँकेत रक्तदान शिबिराचे आयोजन करून अनेक पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून रुग्णाचे जीव वाचवण्यासाठी आपले समाजाप्रतीचे कर्तव्य पार पाडले. तसेच वाढदिवशी वायफळ खर्च करण्यापेक्षा पक्ष वाढीचे कार्य करून वाढदिवस अविस्मरणीय करण्याचे कार्य उदगीर शहर मनसेने केले. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक तरुणाने मनसे पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी तरुणांचा पक्षप्रवेश करून घेऊन सर्व विधानसभेतील पदाधिकाऱ्याची कौतुक केले. तसेच राज ठाकरे यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. यावेळी संजय पवार, ओंकार रोडगे, भूषण बनाटे,पवन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात तरुणांनी पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी उदगीर तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, जळकोट तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिवशेट्टे, शहराध्यक्ष संतोष भोपळे,तालुका सचिव सुनील तोंडचिरकर, तालुका उपाध्यक्ष गुरुदत्त घोणसे, मनविसे तालुकाध्यक्ष रामदास तेलंगे, शहर उपाध्यक्ष लखन पुरी, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष बापूराव जाधव ,अजय भंडे, जब्बार तांबोळी, विष्णू अंधारे,परमेश्वर भोसले, अमोल गाजरे,दत्ता कारलेवाड,जयपाल चव्हाण,शरद चिखले, भानुदास राजेकर, प्रशांत राठोड,संतोष बोईले, गणेश किने, नामदेव राठोड,मनोज हनुमंते आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!