डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी विद्यालय, निडेबन यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन -2023 चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव देविदासराव नादरगे हे होते. तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक रमेशजी अंबरखाने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुनिलजी सोमवंशी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी, रमाकांतराव बनशेळकीकर, रमाकांतराव मध्वरे, श्रीमती स्मिताताई पोद्दार,शिवमुर्ती भातांब्रे, प्रा. शिवाजीराव देवनाळे, सूर्यकांतराव पांचाळ, विश्वनाथराव बिरादार, दशरथराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक रमेशजी अंबरखाने व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. रमेशजी अंबरखाने यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
शाळेतील बालकांनी स्नेहसंमेलनात आपल्या कलाविष्कारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले .देशभक्तीपर गीत, कोळी गीत, लोकगीत ,भक्तीगीत ,नाटिका अशा विविध प्रकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुलता बोडके व रोहित बिराजदार यांनी केले तर आभार मु.अ.ज्ञानोबा कुंडगिरे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमेश नादरगे, शरेश्चंद्र पांचाळ ,विजयकुमार पवार ,लक्ष्मण गायकवाड, अमोल कांबळे, राहुल चामले,वर्षा पाटील, सुनिता शिंदे, आम्रपाली सोमवंशी, स्वाती कुलकर्णी, मनोरमा तेलंगे ,विठ्ठल नादरगे ,प्रशांत पांचाळ, शशिकुमार पाटील आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!