महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त भजन, गायनाने आदरांजली चा प्रयास.
उदगीर(एल.पी.उगीले) : येथील प्रयास या सामाजिक परिवाराने लॉयन्स क्लब उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथील महात्मा गांधी उद्यान येथे भजन, गायनाने महात्मा गांधी यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले.
महात्मा गांधी उद्यान येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला व सभोवतालचा परिसर फुलांनी सुशोभित करत एक वेगळे देखणे रूप देण्याचा प्रयास काही तरुणांनी एकत्रित येऊन केला.
साधारण एक तास महात्मा गांधी यांच्या जीवनावरील भजन गायन श्याम कुलकर्णी व ओंकार संगीत विद्यालयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
या कार्यक्रमासाठी राजेश्वर निटूरे,बस्वराज पाटील ,रंगा राचूरे,कल्याण पाटील,डॉ. रामप्रसाद लखोटीया,ॲड व्यंकटराव मोरे,शिलाताई पाटील राजूरकर,प्रा.प्रणिता पाटील राजूरकर,मंजूर खां पठाण,रामराव बिरादार,नरेश सोनवणे,अहमद सरवर,अजित शिंदे,आशिष पाटील राजूरकर,बबलु जाधव,निखिल मोरे,ओमकार गांजुरे,ॲड नवाज मुंजेवार ,मुंतजिब खाजा,शिवाजी देवणाळे,बालाजी पाटील,विजय निटूरे,गजानन सताळकर,रवी हसरगुंडे,फय्याज शेख,विजयकुमार चवळे,अमोल घुमाडे,श्रीनिवास एकुरकेकर,सद्दाम बागवान,युवराज धोत्रे,राजकुमार बिरादार,सतीश पाटील मानकीकर,यासीन शेख,नागेश पटवारी,आशिष चंदेले, फय्याज डांगे,यशवंत पाटील,प्रा.लांडगे सिद्धेश्वर,अंकुश राठोड,संदीप पाटील,विनायक चाकुरे,अनिल मुदाळे,महेश तोडकर,कुणाल बागबंदे,अरविंद सासट्टे,विक्रम हलकिकर,ज्ञानेश्वर बिरादार येणकीकर व प्रयास परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
