देवणी येथे सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
देवणी ( रणदिवे लक्ष्मण) : देवणी येथील श्री गुरुलिंगेश्वर वीरक्त मठाचे मठाधिपती म.नी.प्र सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या ८ व्या पट्टाभिषेक वर्धापन दिनानिमित्त दि.३० जानेवारी ते दि. ४ फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये दि.३० जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी ९ ते १२ श्री गुरुलिंगेश्वर संजीवन समाधीस संगीत महारुद्राभिषेक आणि दररोज सायंकाळी ५ ते ७ विविध धार्मिक क्षेत्रातील महाराजांचे आशीर्वाचन होणार आहे. सोमवारी दि.३० रोजी सायंकाळी ५ ते ७ डॉ. श्री ष.ब्र.१०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, मुखेड यांचे प्रवचन होणार आहे. मंगळवारी दि. ३१ जानेवारी रोजी श्रीम.नि.प्र. शिवानंद महास्वामीजी, हुलसुर यांच्या यांचे सायंकाळी ५ ते ७ आशीर्वाचन वचन होणार आहे बुधवारी दि.१ फेब्रुवारी रोजी श्री ष.ब्र.१०८ शंभूलिंग शिवाचार्य महाराज, उदगीर व म.नी. प्र. शिवानंद महास्वामीजी, सायगाव यांचे सायंकाळी ५ ते ७ आशीर्वचन होणार आहे. गुरुवारी (दि.२) रोजी श्री ष.ब्र.१०८ चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, माजलगाव यांचे आशीर्वाद शुक्रवारी दि.३ फेब्रुवारी रोजी धर्मसभेचे आयोजित करण्यात आले आहे. या धर्मसभेकरिता श्री ष.ब्र.१०८ नंदकिशोर शिवाचार्य महाराज सोनपेठ व श्री ष.ब्र.१०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, जिंतूर यांचे या धर्मसभेस व भक्त गणास आशीर्वाचन होणार आहे. या धर्मसभेत लिंगायत समाजातील शैक्षणिक स्पर्धात्मक परीक्षेत व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचे सत्कार होणार आहेत. शुक्रवारी (दि.४) रोजी सकाळी८ ते १२ शिवयोगी श्री गुरुलिंगेश्वर पालखी महोत्सव शहराच्या मुख्य रस्त्यावरून निघणार आहे. दुपारी १२ च्या नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने याची सांगता होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचे आवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन श्री गुरुलिंगेश्वर विश्वस्त समिती व वर्धापन दिन महोत्सव समिती यांच्याकडून करण्यात आले आहे.
