उगिलेवाडी येथे पहिले जागल एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात साजरे

उगिलेवाडी येथे पहिले जागल एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात साजरे

    *साहित्य संमेलनातून स्नेहभाव वाढला पाहिजे*.

  *ज्येष्ठ कवयित्री  ललिता गादगे यांचे प्रतिपादन*

लातूर (प्रतिनिधी) : अहमदपूर तालुक्याला एक सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक परंपरा असल्याचे सांगून, वाचन संस्कृतीला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे काम शाळा आणि महाविद्यालयातून सातत्याने चालते. म्हणूनच मराठी साहित्याच्या वाचनाने आपापसातील मतभेद विसरून स्नेहभाव व माणुसकी वाढवावे असे  प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री व ज्येष्ठ लेखिका प्रा.ललिताताई गादगे यांनी केले.
      ज्येष्ठ लेखिका ललिता गादगे ह्या दि.२९ रोजी मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरच्या वतीने आयोजित तालुक्यातील उगलेवाडी येथील संत तुकाराम फार्म हाऊस मध्ये पहिल्या ‘जागल’ एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना काढले.
    यावेळी जागल या व्यासपीठावर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ समाजसेवक दिगंबरराव बरसपट्टे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, कार्यवाह व लेखक द.मा.माने, स्वागताध्यक्ष डॉ. चंद्रकांत उगिले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
     यावेळी पुढे बोलताना ललिता गादगे म्हणाल्या की, व्हाट्सअप, फेसबुक मुळे वाचन संस्कृती मागे पडत असल्याचे सांगून ग्रामीण व शहरी भागातील तरुणांनी विवेकावर आधारित लिखाणाकडे वळावे, माणसातील माणूस ओळखा, विविध जाती-धर्माच्या लोकांना एकत्रित करून अक्षर वाङ्मय निर्माण करून ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना लिहिते करा असे सांगितले.
    यावेळी उद्घाटक दिगंबर बुरूसपटे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृतीची जपणूक करून त्याची रुजवणूक करावी असे आवाहन केले.
    यावेळी दुसऱ्या सत्रात “मी का लिहितो ?” या विषयावर महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासपूर्ण परिसंवाद झाला. यात बहुप्रसव लेखक व सुपरिचित साहित्यिक मोहीब कादरी, प्रा. डॉ. नानासाहेब सूर्यवंशी, सेवानिवृत्त प्रा. द.. मा. माने यांचे सविस्तर असे विवेचन पूर्ण मार्गदर्शन झाले.
    प्रास्ताविक म.सा. प. शाखा अहदमपूरचे  कार्यवाह द. मा. माने यांनी तर सूत्रसंचालन राम तत्तापुरे, जिलानी शेख यांनी तर आभार आशिष गुणाले यांनी मानले.
   शेवटच्या सत्रात कवी संमेलन ज्येष्ठ कवी उदय जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यात बिनधास्त कवी बालाजी मुंडे, कवी वैजनाथ गीते, कवी तुकाराम हरगीले, प्रा. विद्या बयास ठाकूर, प्रा. अनिल चवळे, कवी महेंद्र खंडागळे, कवयित्री शहादा सय्यद यांनी बहारदार कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी राजसाहेब कदम यांनी तर आभार ज्ञानोबा भोसले यांनी मानले.
     या साहित्य संमेलनाला सदिच्छा भेट माजी मंत्री बाळासाहेब जाधव,  आमदार बाबासाहेब पाटील यांनी भेट देऊन या संमेलनाचे कौतुक केले. यावेळी राज्य विक्रीकर आयुक्त शिवाजीराव जाधव, डॉ. अंजली उगिले, प्राचार्य नीळकंठ पाटील, प्राचार्य दिलीप मुगळे अंनिसचे हरिदास तम्मेवार, अभियंता अनिल फुलारी, डॉ. वैभव रेड्डी यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण भाऊ काळे, यांच्यासह पदाधिकारी व सर्व सदस्य, महिला आणि बहुसंख्य साहित्य प्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
    पहिल्या एकदिवसीय जागर साहित्य संमेलनाचा शुभारंभ उद्घाटक दिगंबर बुरूसपटे यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवड करून स्वागत गीताने करण्यात आला. तर साहित्य संमेलनाचा समारोप हर्ष काळे यांच्या राष्ट्रगीताने करण्यात आला.
    संमेलन यशस्वी करण्यासाठी बालाजी उगिले, प्रवीण उगिले यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!