हावगीस्वामीच्या मराठवाडास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
उदगीर (एल.पी.उगीले) : श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील निबंध,वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्यावतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक या विषयावर मराठवाडास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील स्पर्धेत परभणी, बीड, नांदेड व लातूर या चार जिल्ह्यातून वरिष्ठ महाविद्यालयातील पंधरा स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्रतीक्षा बळीराम गजिले बी.ए.द्वितीय वर्ष,शिवजागृती महाविद्यालय नळेगाव जि.लातूर, पूजा सायन्ना मामीडवार बी.कॉम. तृतीय वर्ष, हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालय अर्धापूर जि. नांदेड, सौरभ साईनाथ, बी.फार्मसी तृतीय वर्ष जगळपुरे माऊली कॉलेज फार्मसी, उदगीर जि.लातूर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक प्राप्त केले. स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ, हुतात्मा गोविंद पानसरे, दत्तोबा भोसले, पंडित वीरभद्र आर्य, बाबासाहेब परांजपे, आप्पाराव पाटील कोळखेडकर, दत्तोबा भोसले इत्यादी अनेक स्वातंत्र्यसैनिकावर विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधाच्या माध्यमातून प्रकाश टाकले.स्वतःच्या हस्तक्षरात निबंध लिहून काही दुर्मिळ फोटो देखील विद्यार्थ्यांनी पाठविले, निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ व डॉ.व्ही.डी.निरगुडे यांनी काम पाहिले. देशाभिमान व राष्ट्रवाद ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजेत, मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांचे स्मरण झाले पाहिजे, आपल्या परिसरातील स्वातंत्र्यसैनिक कळाले पाहिजेत, व विद्यार्थ्यांनी मुक्तीलढा समजावून घेतला पाहिजे.या व्यापक उद्देशाने मराठवाडास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यशस्वी व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, निबंध,वक्तृत्व व वादविवाद मंडळ समितीतील डॉ.म.ई. तंगावार, प्रा.वसंत पवार, डॉ.दत्ताहरी होनराव, प्रा.धनराज बंडे, प्रा.जे.डी.संपाळे, प्रा.एन.आर.हाके, प्रा.मनोहर भालके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
