लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी अंबादास गायकवाड रुजू

लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी अंबादास गायकवाड रुजू

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी अंबादास गायकवाड हे नुकतेच रुजू झाल्याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यापूर्वी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री सिद्धेश्वर विद्यालय माजलगाव येथे काही महिने त्यांनी पर्यवेक्षक म्हणून कार्य केले आहे.तसेच लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात 1992 पासून इंग्रजी विषयाचे सहशिक्षक तसेच पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक अशा विविध पदांवर उत्कृष्टरित्या कार्य केले आहे.संस्था आदेशाने ते उदगीर येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात रुजू झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार, कार्यवाह तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शंकरराव लासुणे, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, पूर्वीचे मुख्याध्यापक बाबुराव आडे, पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर, लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले अभ्यासपूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार,विनायक इंगळे तसेच माजी विद्यार्थी संघाच्या वतीने नीता मोरे,आशा मोरे, अमोल निडवदे,मोहिनी अचोले,प्रीती भोसले, डॉ. हर्षवर्धन जाधव,अमर जाधव, विवेक जाधव, शिवाजी हंचनाळे,सुरेखा शिंदे, सुप्रिया बुधे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!