दिलीप कोकाणे, उपसरपंच बाबुराव कापसे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

दिलीप कोकाणे, उपसरपंच बाबुराव कापसे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळकोट(एल.पी.उगीले) : जळकोट तालुक्यातील अतणूर परिसरात राष्ट्रवादीचे वारे गतिमान झाले असून माजी सरपंच दिलीप कोकणे विद्यमान उपसरपंच बाबुराव कापसे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतरावजी पाटील यांच्या हस्ते व माजी गृहराज्यमंत्री आ. संजय भाऊ बनसोडे, बसवराजजी पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आ संजय भाऊ बनसोडे यांचे नेतृत्व स्वीकारून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत समजले जाणारे कार्यकर्ते अतनूरचे माजी सरपंच दिलीप कोकणे यांच्या समवेत बाबुराव कापसे यांनी माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्यावर विश्वास ठेवून मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या समयी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जळकोट तालुक्याचे तालुका अध्यक्ष अर्जुनजी मामा आगलावे, माजी जि प सदस्य रामरावजी राठोड, म्हाताब बाही बेग, आतनूर चे सरपंच चंद्रशेखर पाटील, शिरीषजी चव्हाण, गजानन पाटील, जयराज पाटील इत्यादी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!