मेथी येथे १ कोटी ३ लाख ८८ हजार ५४५ रूपायांचे विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळा आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न !
अहमदपूर (गोविंद काळे) : ग्रामपंचायत कार्यालय मेथी ता.अहमदपूर येथे विविध विकासकामांच्या भूमीपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेबजी पाटील उपस्थित राहून विकासकामांचे भूमिपूजन करत लोकार्पण केले. तसेच ग्रामस्थांशी सुसंवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंजली युवराज पाटील यांनी मांडले प्रास्ताविकामध्ये त्यांनी गावच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी बाबासाहेब पाटलांकडे साकडे घातले व त्यांनी जो विकासनिधी दिला व नळयोजनेसाठी जो पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
विकासकामांमध्ये मूलभुत योजने अंतर्गत सिमेंट रस्ता : १० लक्ष रुपये, जनसुविधा योजने अंतर्गत सिमेंट रस्ता : ९.५ लक्ष रुपये, म.गा.रे.गा.अंतर्गत जि.प.शाळा ते धनराज कोडगिरे यांच्या शेतापर्यंत रस्त्याचे खडीकरण करणे : १७ लक्ष रु, जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी योजनेचा शुभारंभ : ६० लक्ष ८७ हजार ५४५ रु, आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत जि.प.शाळेस शैक्षणिक साहित्य वाटप व आर. ओ. वॉटर फिल्टर मशिन बसविणे, अंगणवाडीमध्ये विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटप व आर.ओ. वॉटर फिल्टर मशिन बसविणे, ग्रा.पं. कार्यालय येथे सौर पॅनल उभारणी व अत्यावश्यक वस्तूंचे लोकार्पण बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
“युवराज पाटील यांना सोबत घेऊन मेथी गावाचा विकास करतो- बाबासाहेब पाटील.”
यावेळी मनोगतामध्ये बाबासाहेब पाटील म्हणाले की मेथी गावाचा विकास म्हणावा तसा झाला नाही अगोदरच्या लोकप्रतिनिधीनी म्हणावा तसा पाठपुरावा केला नाही पण आता गावचे सूत्र चांगल्या माणसाच्या हातात आल्यामुळे नक्कीच गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही याचे पहिले उदाहरण म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील लाईटचा प्रश्न मिटला याबद्दल मला खूप कौतुक वाटतंय. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की आपण ज्या काही समस्या मांडलात त्या समस्या एक लोकप्रतिनिधी म्हणून सोडविल्याशिवाय शांत बसणर नाही आणि विकासनिधी कमी पडू देणार नाही तसेच या गावची ग्रामपंचायत बिनविरोध काडून सौ. लता पाटील यांना सरपंच केलात त्या बद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार मांडले.
प्रसंगी समवेत कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच लताताई कोडगिरे( पाटील), प्राचार्य बाबुरावजी जाधव सर, शिवराज माने सर, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, प्राचार्य निलेश जी राजमाने, जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, सलगरा गावचे माजी उपसरपंच गोविंदराव मोरे, रमेश खोंडे, धनराज पाटील, युवराज पाटील, संजय सुडे, बंडू केंद्रे, रमेश कोंडे, वामन तापघाले पांडुरंग ठाकरे गंगाधर शिंदे ज्ञानोबा तापघाले शेख बेबी फातिमा, बाबूराव वाडकर , बालाजी खोंडे, दिलीप ठाकरे अच्युतराव जाधव, शिवाजी दराडे, ग्रामसेवक गुत्तेवाडीकर व सर्व गावकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल अडसूळ, व आभार नितीन सुडे यांनी मांडले तसेच ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
