महिलांनो, कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको –  डॉ.प्राजक्ता गुडे-गुरूडे

महिलांनो, कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको -  <a href="http://डॉ.प्राजक्ता">डॉ.प्राजक्ता</a> गुडे-गुरूडे

उदगीर (एल.पी.उगीले) : कँन्सर हा जीवघेणा आजार आहे. हे आपल्याला माहिती आहे. अगदी सुरूवातीच्या स्टेजमध्ये कँन्सरचे निदान झाले नाही, तर रूग्णांचा जीव वाचवणे अवघड असते; परंतु अनेकदा महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे कँन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. वेळीच निदान व उपचार न झाल्यामुळे कँन्सर बळवण्याची शक्यता अधिक असते. मात्र बऱ्याच महिलांना कँन्सर बद्दल माहितीच नसते. त्याकरिता महिलांनो, कर्करोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असे मत प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ तथा वंध्यत्व निवारण सेंटरच्या कॉल्पोस्कोपी तज्ञ डाॅ.प्राजक्ता नितीन गुरूडे यांनी केले.

माहेर मॕटनिटी हॉस्पिटल व न्युक्लिअस टेस्ट टयुब बेबी सेंटरच्या वतीने आयोजित कर्करोग दिवसानिमित्त कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालासाहेब शिंदे हे होते.तर  सौ.रूक्मिणी सोमवंशी, सौ.संध्या बालासाहेब शिंदे, रेडिओलॉजिस्ट डॉ.नीतीन गुरूडे, हणमंत साळुंके, सौ.मनिषा सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस.जी.शिंदे यांनी केले.तर आभार प्रविण सोमवंशी यांनी मानले.  यावेळी महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!