जिजाऊ मराठा भवनाचे भूमिपूजन औराद येथे संपन्न, वचनपूर्ती केली – ना.चव्हाण
औराद बा (अंकुशराव वाडीकर) : सीमाभागातील बिदर जिल्ह्यातील औराद बा. तालुक्यांमध्ये जिजाऊ भवन उभारणीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता.लवकरच काम सुरू करू असे आश्वासन दिले होते.त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले, कर्नाटक राज्य पशुसंवर्धन मंत्री तथा यादगीर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा औराद बा. विधानसभा क्षेत्राचे आ. प्रभूजी चव्हाण यांनी सांगितले की,आपण दिलेला शब्द पाळला,या बद्दल आनंद होत आहे असे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात होमहवन व जिजाऊ वंदनाने झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजित शिंदे व खंडेराव रंदवे यांनी तर प्रस्ताविक भाषण शिवाजीराव पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सकल मराठा समाजातील जवळपास चार हजार मराठा मावळे जिजाऊ सृष्टीच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.औराद बा. शहराच्या पश्चिम दिशेस एक एकर जागा ना.प्रभू चव्हाण यांनी स्वतःची जागा जिजाऊ मराठा भवनांसाठी दिली.राष्टमाता माॅ जिजाऊने छत्रपती घडविले.त्या राजमाता जिजाऊ भवनाचे भुमी पुजन संपन्न झाले.
कार्यक्रमात मंत्री महोदयानी मतदार क्षेत्रात विकास कामे केलेल्या कामाचे दाखले देत मराठा समाजाला 3B मधून कडून 2A मध्ये घालण्यासाठी मी प्रयत्न करेन असे सांगून औराद बा तालुक्यांची शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकले .शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी 36 बारमाही तळयाना संजीवनी देण्यात आली आहे . या औराद बा तालुक्यात शांतता नांदत आहे असे म्हणाले .नांदेड बिदर रेल्वे मार्ग बनवून दळणवळण व राष्ट्रीय महामार्ग रस्ते औराद बा. तालुक्याला रेल्वे महामार्गाने जोडण्यात आले असे म्हणाले .कार्यक्रमात मराठा समाजाचे काही मान्यवर उपस्थित होते. शिवाजीराव पाटील मुंगणाळकर , अनिल वाडीकर, केरबा पवार, शिवाजीराव काळे ,रंगराव जाधव, किशनराव काळे, सतीश पाटील, पंडीतराव पाटील, बाळासाहेब पाटील,भगवान पाटील, मारूती वाडीकर,योगेश पाटील, अंकुश वाडीकर, सूरेश भोसले, प्रवीण कारभारी, भरत कदम, कोंडीबा सावकार, अनेक मावळे उपस्थित होते. शिवाजी पाटील मुंग्णाळकर यांनी परिसरातील विकासकामाची माहिती दिली, व नवीन कामांसाठी निवेदन दिले. कार्यक्रमासाठी मराठा समाज मोठया प्रमाणावर उपस्थित होता, आभार प्रदर्शन अमर जाधव यांनी केले.
