सरस्वती विद्यालयात दहावी वर्गाचा स्वयंशासन दिन साजरा

सरस्वती विद्यालयात दहावी वर्गाचा स्वयंशासन दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : सरस्वती माध्यमिक विद्यालय कुमठा (बु.) येथे इयत्ता दहावीच्या वर्गाचा स्वयंशासन दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून स्वयंशासन दिनाच्या विद्यार्थी मुख्याध्यापिका कु. ढाकणे अस्मिता होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक महंमद शेख उपस्थित होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक शिंदे जी.आर, पर्यवेक्षक वाघमारे एम.बी., सांस्कृतिक विभाग प्रमुख कांबळे यु .आर,ज्ञानेश्वर जवळे आणि स्वयंशासन  दिनाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.या प्रसंगी शेख मोहसीन,कलवले शिवम, बाबळसरे ज्ञानेश्वर ,सूर्यवंशी साक्षी,कांबळे स्नेहा,गायकवाड दिव्या,मोरे कीर्ती,आदित्य दुर्गावाड,कवडगावे प्रतीक,पवार रुपेश,पवार कृष्णा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर जवळे ज्ञानेश्वर,कांबळे यु.आर,पर्यवेक्षक वाघमारे एम.बी यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापिका ढाकणे अस्मिता हिने केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे स्नेहा हिने केले. तर आभार प्रदर्शन सूर्यवंशी साक्षी हिने केले.

About The Author

error: Content is protected !!