इनरव्हील क्लब व माहेर हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत रोगनिदान व औषध उपचार शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) : माहेर हाॅस्पिटलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त उदगीर इनरव्हील क्लब व माहेर हाॅस्पिटल द्वारे महिलांसाठी मोफत विविध रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये दुर्बिणीद्वारे कॅन्सर निदान, महिलांच्या शरिरातील रक्त व लोह प्रमाण तपासणी,थाॅयराईड तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा फायदा अनेक महिलांनी घेतला.
माहेर हाॅस्पिटलच्या डॉ. प्राजक्ता गुरुडे या इनरव्हील क्लबच्या सदस्य असुन त्या MBBS,DGO,DNB,FICOG अशा अनेक पदवी प्राप्त आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या उच्च शिक्षणाचा लाभ गरजू लोकांना व्हावा. यासाठी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून त्या नेहमीच मोफत शिबिराचे आयोजन करत असतात, यासाठी डॉ. प्राजक्ता गुरुडे यांचे विशेष कौतुक व अभिमान वाटतो, असे मत इनरव्हील क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले यांनी व्यक्त केले.
या शिबिरासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले यासोबतच उपाध्यक्ष सौ. स्वाती गुरुडे, सचिव सौ. शिल्पा बंडे, कोषाध्यक्ष सौ. मानसी चन्नावार, एडिटर सौ. पल्लवी मुक्कावार, आय एस ओ सौ. स्नेहलता चणगे तसेच सदस सौ. योजना चौधरी, डॉ. सौ. सुप्रिया जगताप,सौ. प्रिया नरखेडे व सौ. पल्लवी कुलकर्णी यांची उपस्थिती होती. माहेर हाॅस्पिटलच्या सर्व स्टाफ मेंबरचे या शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले.
