जवळगा येथील कुलकर्णी वाड्यात नाथषस्टी सोहळ्यास प्रारंभ
सामाजिक अंतर राखत कुलकर्णी कुटुंबांनी केली एकनाथ शस्टी साधे पद्धतीने साजरी
जवळगा (प्रतिनिधी) : राज्य शासनाने kovid १९ चे नियम पाळून दरवर्षी प्रमाणे देवणी तालुक्यातील जवळगा येथील कुलकर्णी यांच्या वाड्यात अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीने चालू असलेल्या संत एकनाथ षस्टी निमित्ताने सोहळ्यास गुरुवारी १ एप्रिल रोजी कुलकर्णी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत विधिवत प्रारंभ करण्यात आला नाथषस्टी साजरी करण्याची कुलकर्णी परिवारातील ही चौथी पिढी कार्यरत आहे यावर्षी कोरोणा साथी मुळे नाथषस्टी साधेपणाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कुलकर्णी वाड्यात करण्यात आली.
यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाची साथ बघता व शासनाच्या निर्देशानुसार या नाथ ष स्टी सोहळ्यात केवळ कुलकर्णी कुटुंबातील १५ सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी पद्माकर कुलकर्णी, हारिराम कुलकर्णी, माधव महाराज कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, कृष्णा कुलकर्णी, बालाजी कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, राजू जोशी, पंडितराव कुलकर्णी, बबन जोशी, निखिल कुलकर्णी , चैतन्य कुलकर्णी उपस्थित होते.