आदर्श ग्रामसेवक म्हणून धनंजय भोसले यांची निवड
निलंगा (प्रतिनिधी) : नणंद येथे सध्या ग्रामसेवक या पदावर कार्यरत असलेले धनंजय रामराव भोसले यांची लातूर जिल्ह्यातून एकमेव आदर्श ग्रामसेवक या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यातील ग्रामसेवक संघटनेच्या मागणीनुसार जिल्हा परिषद स्तरावर अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांना शासन स्तरावरून यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळ्यात
पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी होती. या मागणीचे राज्य शासनाने दखल घेत सन 19/20 च्या मूल्यमापनाच्या आधारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक अतिउत्कृष्ट, आदर्श ग्रामसेवक म्हणून लातूर जिल्ह्यातून धनंजय रामराव भोसले यांची निवड करण्यात आली. गावच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या गावातील लोकांसोबत मनमिळावू राहणारे निलंगा तालुक्यातील मौजे नणंद व माकणी थोर येथे सध्या कार्यरत असलेले धनंजय रामराव भोसले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यशवंत पंचायत अभियान हा पुरस्कार ग्राम विकास मंत्री यांच्या हस्ते वितरण सोहळ्याच्या वेळी प्रदान करण्यात येणार आहे. नणंद येथील विद्यमान सरपंच हरिदास बोळे यांनी यावेळी ग्रामसेवक श्री. धनंजय भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी बोधले, भीमा पाटील, बाबुराव पाटील, वैजनाथ लादे, अरविंद गंभीरे, मुज्जू पटेल, एजाज शेख व गावातील लोकांनीही शुभेच्छा दिल्या.