माजी आ.कव्हेकरांकडून सुरेश पाटील यांचे सांत्वन

माजी आ.कव्हेकरांकडून सुरेश पाटील यांचे सांत्वन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील आर.एस.एस.चे सक्रीय कार्यकर्ते व जनकल्याण विद्यालयाचे प्रमुख सुरेश पाटील यांचे वडील डॉ.मनोहर सखाराम पाटील (वय 88 वर्ष) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, सहा मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या हरंगुळ (बू) येथील निवासस्थानी भेट देवून पाटील कुटुंबियाचे सांत्वन केले. यावेळी चि.सुरेश पाटील, शशीकांत पाटील, रमाकांत पाटील, व्यंकट लामजने यांच्यासह कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासमवेत कमलाकर कदम आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!