769 कोरोनाबाधित रुग्ण; 7 रुग्णाचा मृत्यु
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात 769 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 7 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1252 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 365 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 2168 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 404 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34221 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 5284 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 759 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 28178 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 418 आहे.