कोरोणाबाधीत जनतेला शासनाने आर्थिक सहाय्य करावे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

कोरोणाबाधीत जनतेला शासनाने आर्थिक सहाय्य करावे - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : संपूर्ण देशामध्ये कोरोणाबाधीतांचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठे आहे. त्यामुळे शहरात लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमिवर निर्बंध आणली जात आहेत. कोरोणाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून अनेकांचे व्यवसायही उद्ध्वस्त झालेले आहेत. परिणामी आर्थिक संकटाला कंटाळून अनेक लोक आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे अमेरिका, जपान व इतर देशामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना आर्थिक मदत केली पहिजे. केंद्र सरकारने 21 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. पंरतु महाराष्ट्र शासनाने मात्र कुठलीच मदत केली नाही. त्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाला सामारे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणे राज्यानेही कोरोणाबाधीत जनतेला तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली. यावेळी ते कव्हा येथे आयोजित कोव्हिड-19 च्या पार्श्‍वभूमिवर लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी बोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकी अधिकारी डॉ.एस.एम.बिराजदार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.किरण कराळे, बोरी प्राथमिक केंद्राचे आरोग्य सहायक बी.के.गिरी, आरोग्य कर्मचारी नितीन स्वामी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम रूकमे, जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बालाजी घार, माजी सररंच अच्युतराव पाटील, ग्रा.प.सदस्य नेताजी मस्के, नामदेव मोमले, गोपाळ सारगे, लक्ष्मण सुर्यवंशी, ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, अमेरिकेमध्ये 75 हजार डॉलर व दिड लाख डॉलर वार्षिक उत्पन्‍न असणार्‍या कुटुंबाला शासनाने मदत दिली. लहान उद्योजकांनी मागणी केल्यावरून त्यांच्या कर्मचार्‍यांना पैसे दिल्याची माहिती मिळाली, अशी मदत तीन वेळेस केल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही मदत करावी. लातूर जिल्ह्यामध्ये कोरोणाचा कहर होत आहे. गुरूवारी एका दिवसात 707 रूग्ण सापडले. आतापर्यंत 33492 रूग्ण झाले असून 752 रूग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली. यासाठी बेड, व्हँटिलेटरची कमतरता असल्याची माहिती मिळते. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देवून पुर्तता करण्याची मागणीही राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचेही माजी आ.कव्हेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कोव्हिड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्राथमिक उपकेद्रांच्यावतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी यांनी केले.
आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी होणार लसीकरण
45 वर्षावरील सर्वांसाठीच कोव्हिड-19 लसीकरण सुरू करण्यात आले असून या मोहिमेचा शुभारंभ कव्हा प्राथमिक उपकेेंद्रामध्ये करण्यात आला. लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यांनतर 28 दिवसाला दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. तसेच कव्हा गावातील इतर नागरिकांनाही कोव्हिड-19 लस घ्यावयाची असेल तर दर शनिवारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कव्हा येथे संपर्क साधावा. सध्यापर्यंत 450 जणांची नोंदणी झालेली असून इतर नागरीकांनीही नोंदणी करून कोव्हिड-19 लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बोरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस.एम.बिराजदार यांनी केले आहे.

About The Author