शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

लातूर (प्रतिनिधी) : जिल्हयातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सन 2020-21 या वर्षासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती (GOI) व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी हे पोर्टल दिनांक 3 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे.

जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती चे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी महाविद्यालय लॉगीनवर पाठवावे. महाविद्यालयाचे शिष्यवृत्तीचे काम पाहणारे कर्मचारी व प्राचार्य यांनी अर्जाची अचूक पडताळणी करुन मंजूरीस्तव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर कार्यालयास दिनांक 15 एप्रिल 2021 पर्यंत ऑनलाईन सादर करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!