महावितरण कर्मचाऱ्यावर कार्यवाही करा शहर शिवसेनेचे (ठाकरे गट) निवेदन
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील प्रभाक क्रमांक 9 व 10 मध्ये कार्यरत असलेल्या महावितरणरच्या कर्मचाऱ्याचा मनमारी कारभार चालला असुन यामुळे नागरीकांना नाहक त्रास होत असल्यामुळे संबंधीत कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यासाठी शिवसेना( ठाकरे गट ) शहर यांच्या वतीने उप- कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की, शहरातील प्रभाग क्रमांक 9 व 10 या भागात कार्यरत असलेले महावितरण कार्यालयातील कर्मचारी लाईनमन संतोष पाटील हे कर्तव्यात कसूर करुन प्रभागातील धन दांड्या व्यक्तीकडून घूस घेऊन आर्थिक संबंधातून त्यांना अभय देत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना रुपये देण्या घेण्यावरून शिल्लक बिलापोटी पूर्व सूचना न देता नागरिकांचे वीज कनेक्शन कट करीत आहेत व तसेच प्रभागातील काही भागात काही लोक सर्रास आकडे टाकून वीज वापर करणाऱ्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियमित वीज बिल भरणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास देत आहे तरी लाईनमन संतोष पाटील यांना तत्काळ निलंबन करून पारदर्शक व सर्वसामान्यना न्याय देणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी तक्रार प्रभागातील नागरिकाकडून करण्यात येत आहे अश्या आशयाचे निवेदन शिवसेना अहमदपूर शहर ( ठाकरे गट ) यांच्याकडून उप – कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले या निवेदनावर शहर प्रमुख शिवानंद कासले यांची स्वाक्षरी आहे यावेळी उप- शहर प्रमुख शिवकुमार बेद्रे, गणेश कासनाळे, नवनाथ पुणे पुंडलिक कदम ,सागर सातपुते आदिंची उपस्थिती होती.