अजितदादा पवार मुख्यमंत्री होणारच – आमदार पाटील

अजितदादा पवार मुख्यमंत्री होणारच - आमदार पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : चाकूर मतदारसंघ नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालकांचा सत्कार सोहळा दिप वर्षा मंगल कार्यालय येथे पार पडला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालकांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील विकासकामांबाबत लेखाजोखा मांडला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यभरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली.माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आदरणीय दादांनी राज्याची घडी बसविण्याचे उत्तम काम केलं. अहमदपूर चाकूर मतदारसंघासाठी राज्याचे अर्थमंत्री असताना अजितदादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. याबद्दल त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. आम्ही आदरणीय पवार साहेबांचे आणि अजितदादांचे कार्यकर्ते असून म तदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. मूलभूत सुविधा, आरोग्य,कला, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात बदल घडवून राष्ट्रीय एकात्मता जपणं हे आपलं कर्तव्य आहे.

प्रशासनावर असणारी मजबूत पकड आणि विकासकामांची दूरदृष्टी असणारा नेता अजितदादा पवार एक दिवस राज्याचे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार, यात तीळमात्र शंका नाही. आपल्या लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याचा विकास साधायचा असेल तर अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं.असे मत यावेळी व्यक्त केले. प्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रमजी काळे, अफसर शेख, सुरज चव्हाण, रघुनाथ कुचेकर, माजी महापौर अख्तर मिस्त्री, शिवानंद हेंगणे, करीम साहेब गुळवे, बालासाहेब पाटील आंबेगावकर, शिवाजीराव काळे, सुदर्शन मुंडे, हरिओम काळे, यशवंत जाधव, उत्तमराव वाघ, शिवाजीराव . खांडेकर, महेश हंबीर, प्रशांत भोसले, माधवराव जाधव, दयानंदराव सुरवसे, गोपीनाथ जोंधळे तसेच नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक मंडळ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बांधव, आणि मोठ्या संख्येने मतदार संघातील जनता उपस्थित होती.

About The Author