सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी यांच्या मार्फत आरोग्य निदान शिबीर संपन्न !
अहमदपूर (गोविंद काळे) : सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. महेशनगर, उजना येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, लातूर व प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी अंतर्गत कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, ऊस तोड कामगार व आजुबाजुचे परिसरातील व नागरिकांसाठी कारखाना साईटवर आज आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून शिबिराचा शुभारंभ केला.
सर्व वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी चांगली सेवा देत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व वेळोवेळी आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा जेणेकरून भविष्यात उद्भवणारे गंभीर आजार टाळता येतील. तसेच आरोग्य विमा, अपघात विमा प्रत्येकाने घ्यावा, असे मत यावेळी आमदार यांनी व्यक्त केले.
शिबीरामध्ये ऊस तोड कामगार, कर्मचारी यांचे बी.पी. मधुमेह तपासणी तसेच गरोदर महिला, कर्करोग, थायराईड, कावीळ, लिव्हर, किडणी, इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी कारखाना परिसरातील ऊस तोड कामगारासह वडारवाडी, पेमा तांडा, सांगली तांडा, राळगा, तुळशिराम तांडा, उजना राळगा तांडा आदी गावातील 343 लोकांनी शिबीराचा लाभ घेतला.
प्रसंगी सिध्दी शुगरचे व्हाईस प्रेसिडेंट प्रफुल्ल जी. होनराव साहेब, वैद्यकिय अधिकारी डॉ. बाळासाहेब बयास, डॉ. जयप्रकाश केंद्रे, सीएचओ डॉ. नित्यनंदा कुमार, अमित राठोड, तनुप्रिया घोडके, जनरल मॅनेजर एस.आर. पिसाळ साहेब, जनरल मैनेजर (फॅक्ट्री मैनेजर कम टेक्रीकल) बी.के. कावलगुडेकर साहेब, जनरल मॅनेजर (डिस्टीलरी) श्री. एस. बी. शिंदे साहेब, चिफ फायनान्स ऑफिसर आनंद पाटील, डिस्टीलरी मॅनेजर सागर जाधव, ऊस विकास अधिकारी वाय. आर. टाळे, ऊस पुरवठा अधिकारी व्ही. के. येदले, सल्लागार सोमवंशी साहेब, पर्यावरण अधिकारी श्री. दिलीप ताटे, सिव्हील इंजिनीअर साळुंके, परचेस ऑफिसर धनराज चव्हाण, सुरक्षा अधिकारी डोंगरे, गोडाऊन किपर अरविंद कदम, गार्डन सुपरवायझर हरिभाऊ पांचाळ, कार्यक्रमाची प्रस्तावना कारखान्याचे परचेस ऑफिसर . धनराज चव्हाण व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.