सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची दमदार कामगिरी ; १० लाखाचा गुटखा जप्त

सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची दमदार कामगिरी ; १० लाखाचा गुटखा जप्त

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात ९ लाख ९१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त करून चार व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याची माहिती काढून त्यांवर ही कारवाई केली आहे. शहरातील विठ्ठल गुरुलिंग हामणे, बबन बाबू पठाण, राजू उर्फ शिवलिंग गुरुलिंग हामने, शंकर कानगुले या चार आरोपींनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला वेगवेगळ्या कंपनीचा व. महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला ९ लाख ९१ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू साठवणूक केल्याने तो जप्त करण्यात आला आहे. लातूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल लोंढे यांच्या तक्रारीवरून वरील चार आरोपी विरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुरनं. ७३/ २०२३ कलम ३२८, १८८, २७२, २७३ भादवी तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५९ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून चार पैकी दोन आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोकडे, पोलीस अमलदार कलमे, पुठेवाड, बाळासाहेब साळवे, बापूराव धुळगुंडे, सुदर्शन घुगे, आरदवाड, रतनदीप कांबळे यांची उपस्थितीत पार पाडली.

About The Author