शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीची आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यात ओळख व्हावी – अजित पवार

शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीची आदर्श ग्रामपंचायत म्हणून राज्यात ओळख व्हावी - अजित पवार

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरुर ताजबंद ग्रामपंचायत राज्यात एक आदर्श ग्रामपंचायत म्हणुन ओळख व्हावी असे सुधारणात्मक पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी अजितदादा पवार यांनी सांगीतले. कार्यक्रमास माजीमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, औसा माजी नगराध्यक्ष असफर शेख, माजी सरपंच साहेबराव जाधव, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, उपसरपंच सुरज पाटील, युवा नेते युवराज पाटील, म जी चेअरमन बाबुराव उडतेवार बंडू पाटील, विनायक पाटील, अनिल लामतुरे, विजयकुमार यलगट्टे उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते पवार यांनी उपस्थित नागरिकां समोर बोलताना आत्ताच उद्घाटन केलेली सुधारित पाणी पुरवठा चांगली होईलच यात शंका नाही ग्रामपंचायतीने एवढ्यावरच काम न थांबवता पिण्याचे शुध्द पाणी, पथदिवे, जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नाल्या व रस्ते सफाई चांगली जेणे करुन संसर्गजन्य आजार पसरणार नाहीत. शुध्द हवा मिळावी म्हणुन वृक्षारोपन करून वृक्षा जोपासावेत, जेष्ट नागरिकांसाठी चौकात बसण्यासाठी बाके ठेवावीत, गावातील युवकांना ग्रंथालयाची सोय करून एमपीएसी, युपीएसची पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. स्मशानभूम जीत वृक्षारोपन करून स्मशान भूमि सुशोभीत करावी, जिल्हा परिषदेची शाळा सुधारण्यासाठी आवश्यक ती मदत ग्रामपंचायतीकडून कराव्यात. जे निराधार असलेल्या नागरिका करिता फार्म भरण्यासाठी मदत करावी. आपल्या ग्रामपंचायतीच्या पाठीशी मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाबासाहेब पाटील आहे विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाहीत. शिरूर ताजबदच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी आपल्या गावात नागरिकांना सर्व सोयी उपलब्ध करुन द्याव्यात. निधी कमी पडत असेल तर आमदार पाटील यांच्या मार्फत मला सांगा मी निधी उपलब्ध करुन देतो पण शिरूर ताजबंदची ग्रामपंचायत व गाव राज्यात आदर्श गाव म्हणुन नावारुपाला आणावे असे विरोधी पक्ष नेते पवार यांनी सांगीतले. सरपंच बाघमारे, उपसरपंच पाटील, सदस्य व ग्रामस्थांचा उत्साह पाहता शिरुर ताजबंद गाव हे एक आदर्श गाव म्हणुन नावारुपाला नक्कीच येईल अशी मला खात्री असून मला त्यावेळी बोलवा मी नक्कीच येईन असे विरोधी पक्षनेते पवार यांनी सांगीतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम प्रसाद जाजू राजू चव्हाण, सत्यवान भोसले, रमा भातिकरे, बबन बिलापट्टे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. यावेळी शिरुर ताजबंद व परिसरातील सरपंच, चेअरमन, सदस्य व विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author