भारत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेत उदयगिरी अकॅडमीतील 22 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : कोरोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरचे मोठे संकट होते. या काळात सर्वात जास्त नुकसान हे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे झाले. शाळा ,क्लासेस बंद असल्याने 2 वर्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला, याचा परिणाम विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कमी झाली. आणि या परिस्थितीत या 8 वी इयत्तेतील मुलांकडून केंद्र शासनातर्फे घेण्यात येणारी NMMS EXAM जी परीक्षा MPSC, UPSC च्या धर्तीवर घेतली जाते, या परीक्षेचा अभ्यास करून घेणे, खरच शिक्षकांसाठी जिकिरीचे काम होते. अशा परिस्थितीतही उदयगिरी अकॅडमीचे 22 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले. त्यात पृथ्वीराज बीचकुंदे,पृथ्वीराज घोडके,विश्वजीत घोडके,गोपी कल्याणे,वसुंधरा जाधव,पांढरे धनश्री, मोरे धनश्री, स्वामी प्रणव, सातानूरे गणेश, जाधव पुरुषोत्तम, स्वामी सुमित, नळगिरे अथर्व, पाटील श्रेया, डिगोळे नीता, रचना पाटील, गुंडरे शिवम, पिंपळे साक्षी, वट्टमवार सृष्टी, साई केंद्रे, श्रद्धा डोंगरे, शेडोळे बालाजी, सृष्टी केंद्रे. या पात्र विद्यार्थ्यांचा उदयगिरी अकॅडमीतर्फे फेटे बांधुन सत्कार करण्यात आला. पात्र झाल्यापैकी बहुतांश विद्यार्थी भारत सरकारतर्फे मिळणार्या ₹60,000 शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.
या प्रसंगी उदयगिरी अकॅडमीचे संचालक मार्गदर्शक प्रा. गोपाळकृष्ण घोडके , प्रा. संतोष पाटील, प्रा. धनंजय पाटील, प्रा. श्रीगण वंगवाड, प्रा. ज्योती खिंडे, प्रा. मीना हुरदाळे, प्रा. नंदिनी नीटूरे, प्रा. निवेदिता भंडारे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.