जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता – चाकूरकर
लातूर (दयानंद स्वामी) : विज्ञान, अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड घातल्याशिवाय जीवनात यशस्वी होवू शकत नाही,असा सल्ला माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिला. स्टीम एज्युकेशन सेंटर लातूरच्या माध्यमातून दिल्ली येथून लातूर शहरात प्रथमच अत्याधुनिक प्लॅनेटोरियम डोम सोबत रिअर टाईम ४ या टेलिस्कोपसह वैज्ञानिक मार्गदर्शन आणि महाआकाशदर्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा आतापर्यंत एक हजार पेक्षा अधिक विद्याथ्यार्र्ंनी अनुभव घेतला आहे.त्याचाच एक भाग म्हणून आयोजित कार्यक्रमात शिवराज पाटील चाकूरकर हे बोलत होते.
जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट व्यवहार कळला पाहिजे, दुसरी गोष्ट विज्ञानाची माहिती असावी, तिसरी गोष्ट अध्यात्म समजून घेणे गरजेचे आहे. या तिन्ही गोष्टींची आपल्या जीवनात सांगड असेल तर आपण कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही,असे मत चाकूरकर यांनी व्यक्त केले. पृथ्वीसारख्या अनेक पृथ्वी ब्रम्हांडात आहेत,त्याची माहिती प्राप्त केली पाहिजे. अमेरिका, रशिया,चीन,ङ्ग्रान्स,जर्मनी या देशाची प्रगती केवळ विज्ञानामुळे झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. प्रास्ताविक स्टीमचे संचालक प्रा.ओमप्रकाश झुरळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी अग्रवाल या विद्यार्थीनीने केले.यावेळी प्रा. मोतीपवळे, गुलाब पाटील, सिटीझन ङ्गोरमचे सुधाकर तोडकर, सहदेव अकादमीचे सहदेव,सी.के.मुरळीकर, स्टीमच्या प्राचार्य पूनम पाठक, शास्त्रज्ञ महादेव पंडगे, प्रा.संतोष आळंदकर,स्टीमच्या संचालिका सौ.कल्पना झुरळे आदि उपस्थित होते.