स्त्री सन्मान शिवरायांचे नीतिशास्त्र – डॉ.गणेश बेळंबे

स्त्री सन्मान शिवरायांचे नीतिशास्त्र - डॉ.गणेश बेळंबे

उदगीर(एल.पी.उगीले) : छत्रपती शिवराय महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. तो देशाचा आत्मसन्मान आहे. शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करून आपल्या जनतेला न्याय, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुत्व प्रदान केले. असे करणारे ते जगातील एकमेव राजे आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये स्वातंत्र्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करून रोवली. हे वास्तव सत्य कोणालाही नाकरता येत नाही. शिवरायांनी शत्रूच्या स्त्रीला सुद्धा अत्यंत सन्मानाने वागवले. तिच्या अब्रूची सुरक्षा केली. तिचा आदर केला. तिला मानसन्मान दिला. शिवरायांनी आपल्या सैनिकांना सुद्धा सक्त ताकीद होती की, कोणत्याही स्त्रीशी गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. स्त्रीचा सदैव सन्मान करा. असा स्वराज्याचा दंडक होता. पण आज शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये स्त्री सुरक्षित नाही, अगणित अत्याचार होत आहेत. शिवराय समजून घेणे म्हणजे स्त्रीचा सन्मान करणे.अशावेळी शिवरायांच्या स्त्री सन्मान नीतीशास्त्राची प्रकर्षाने गरज जाणवते. त्यामुळे छत्रपती शिवरायांनी जे केले देवालाही जमले नाही. छत्रपती शिवरायांच्या नीतीशास्त्राने स्त्री अत्याचार दूर करून स्त्री शक्तीचा सन्मान केला. त्यांच्या कर्तुत्वाला उंची देणारे ते जगातील जिजाऊ पुत्र महान राजे आहेत असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ. गणेश बेळंबे यांनी उदगीर येथील सार्वजनिक शिवजयंतीच्या महोत्सवी व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रवीण मेगशेट्टी, प्रमुख पाहुणे म्हणून विराज पाटील शिरोळकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबुराव नागरवाड,पर्यवेक्षक व्ही. एम बांगे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही अजने, कार्यालय प्रमुख डी.पी सूर्यवंशी, चंद्रकांत जाधव, दीपक चिखले, रमेश गोविंदवार,आर.एन जाधव, भाऊसाहेब कल्लूरकर,गणेश बारहत्ते,बंडू पाटील लोणीकर, परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील,वनमाला उखळकर, ज्योती सगर, संगीता यसलवाड, शुभांगी बिरादार,अनिता पाटील, सुनंदा मुर्कीकर यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.एस जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन धोंडूबाई जाधव ,आभार सोनाली पाटील यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमल किशोर राजूरकर, माधव जाधव, बिरादार भगवान,कला शिक्षक एन.आर जवळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author