अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण करणे व आर्टीची निर्मिती करण्याची मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ ब क ड वर्गीकरण करणे व आर्टीची निर्मिती करण्याची मागणी दि.16 .2 .2023 रोजी शिवसेना ( ठाकरे गट) च्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले परंतु अनुसूचित जाती आरक्षणाचा लाभ या प्रवर्गातील विशेष जाती समूहाला झाला आहे तीच परिस्थिती बार्टीच्या संदर्भात झाली आहे. बार्टीचा लाभ हे अनुसूचित जाती प्रवर्गातील विशिष्ट जातीसमूहालाच झाला आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ या तत्सम प्रवर्गातील मांग चांभार ढोर ढकलवार भंगी होणार हिंदू खाटीक बुरुड या जाती आरक्षणापासून दूर राहिले आहेत अनुसूचित जाती तील आरक्षण त्या त्या जातीतील लोकसंख्येप्रमाणे त्या जातींना पुरेशी मिळाली नाही. अशा जाती समूहाचा सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सामाजिक न्यायाची भूमिका म्हणून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करणे काळाची गरज झाली आहे त्यासाठी मांग चांभार ढोर भंगी होणार हिंदू खाटीक बोर्ड आधी समाजाची मागणी अनेक दिवसापासून सुरू आहे परंतु सरकार त्याच्याकडे सामाजिक न्यायाच्या भूमिकेने पाहत नाही हे दुर्दैवाची बाब आहे या जातीसमूहांना आरक्षण मिळण्यासाठी तसेच संधीची समानता प्राप्त होण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण होणे तसेच स्वतंत्र अर्थाची निर्मिती करणे म्हणजे सामाजिक न्यायाची भूमिका आहे अनुसूचित जातीचे वर्गीकरण तसेच आर टी चे निर्मिती करण्यासाठी ची मागणी शासनाला तातडीने कळवावे तसेच मातंग व तत्सम समाज मांग चांभार ढोर ढकलवार भंगी होलार हिंदू खाटीक बुरुड आदी जातीचे अनुसूचित जातीचे आरक्षणाचे वर्गीकरण करून प्रवर्गातील वंचित दुर्बल जात समूहाला न्याय द्यावा. अन्यथा समाज आपल्यासाठी आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असे निवेदन शिवसेना कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले सहसचिव पद्माकर पेंढारकर बालाजी शिंदे कोंडीबा हरगीले बालाजी राजपंगे सुनील हरगिले अरविंद धडे आदिंनी निवेदन दिले.