685 कोरोनाबाधित; 10 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यु
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात 685 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 10 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 742 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 226 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 2469 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 459 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35549 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 5714 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 775
रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 29060 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 507 आहे.