कोरोणामुक्तीचा संकल्प : महाराष्ट्र विद्यालयातील विद्यार्थ्यांचे संशोधन ठरले लई भारी
ओमानंद, कार्तिकच्या संकल्पनेतून साकारले “अॅडव्हांन्सड हँड सॅनिटायझर मशीन”
लातूर (प्रतिनिधी) : कोरोणाची रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोणा रूग्णांचा आकडा 33492 वर पोहचला आहे. तर 752 रूग्णांचा कोरोणामुळे मृत्यु झाल्याचे समोर आलेले आहे. ही बाब लक्षात घेवून अशा वातावरणातही कोरोणाशी मुकाबला करण्यासाठी जेएसपीएम संचलित महाराष्ट्र विद्यालयातील अटल लॅबचे विद्यार्थी ओमानंद स्वामी व कार्तिक बनसुडे या दोन विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून “अॅडव्हांन्सड हँड सॅनिटायझर मशीन” बनविली आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना कोरोणाशी मुकाबला करणे शक्य होत आहे. त्यामुळे या संशोधक विद्यार्थ्याचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
जेएसपीएम संचलित शहरातील मजगे नगर भागातील महाराष्ट्र विद्यालयातील अटल लॅबचे विद्यार्थी कु.ओमानंद स्वामी व कार्तीक बनसुडे या विद्यार्थ्यांनी प्राचार्य गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सुपीक संकल्पनेतून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे “अॅडव्हांन्सड हँड सॅनिटायझर मशीन” बनविले आहे.
ग्रामीण पार्श्वभूमी आणि सेमी इंग्लिशच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी जगातील सर्वांत नवीन असलेले आर्टीफिशियल इटेंलिजन्स हे तंत्रज्ञान आत्मसात करणे, त्याचा वापर करणे आणि समाजातील प्रश्न सोडविणे हा उपक्रम सुरू केला असून ही बाब सर्वांच्या दृष्टिने अभिमानाची आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र विद्यालयातील अटल लॅबचे विद्यार्थी ओमानंद स्वामी व कार्तीक बनसुडे यासारख्या अनेक विद्यार्थी कोडींग आणि इतर संकल्पना वर्षभर शिकत आहेत. त्यामुळे या ज्ञानाचा पुरेपुरे फायदा घेवून मुले तंत्रस्नेही बनत आहेत. या माध्यमातून काहीतरी नाविण्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे हीच मुले भारताचे उद्याचे भविष्य राहणार आहे. त्यामुळे त्यामुळे त्याच धर्तीवर प्राचार्यांच्या व अटल लॅब इन्चार्ज अरूण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून “अॅडव्हांन्सड हँड सॅनिटायझर मशीन”ची निर्मिती करून कोराणा मुक्तीचा संकल्प विद्यार्थी ओमानंद स्वामी व कार्तीक बनसुडे यांनी केलेला आहे. त्याबद्दल या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अटल लॅबचे सहाय्यक अफसर शेख, सुधीर देसाई, विपुल कुंम्भोज यांची उपस्थिती होती.