राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत किलबिलची चमकदार कामगिरी..!!

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत किलबिलची चमकदार कामगिरी..!!

अहमदपूर (गोविंद काळे) : नुकत्याच बारामती जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूलचा विद्यार्थी अविनाश कमलाकर जगताप याने 14 वर्ष वयोगटात सहभागी होऊन द्वितीय स्थान पटकावले. त्याला शाळेतील कराटे प्रशिक्षक इरफान अकोले, विशाल सरवदे व क्रीडा शिक्षक शुभम गुजरगे, बी. एल. अभिजीत, मधुकर दासरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील,पर्यवेक्षक महावीर गोडभरले, कार्यालयीन प्रमुख सचिन जगताप व पालकांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!