लोककल्याणाची जाणीव असलेले नेतृत्व नशिबानेच भेटते – शि.भ.प.शिवलिंग शिवाचार्य महाराज

लोककल्याणाची जाणीव असलेले नेतृत्व नशिबानेच भेटते - शि.भ.प.शिवलिंग शिवाचार्य महाराज

उदगीर (एल. पी. उगिले) : लोककल्याणाची तळमळ आणि विकासाची जाण असलेले लोकप्रतिनिधी भेटणे सध्या दुर्लभ झाले आहे. मात्र उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचे भाग्य चांगले असल्यामुळे माजी गृहराज्यमंत्री, आमदार संजय बनसोडे यांच्या रूपाने एक जाणकार आणि लोककल्याणाची भावना घेऊन, मतदार संघाचा विकास करण्यासाठी अहोरात्र धडपडणारा लोकप्रतिनिधी भेटला आहे. असे गौरवउद्गार शि.भ.प.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी काढले.

ते उदगीर विधानसभा मतदारसंघातील सुल्लाळी येथील अखंड शिवनाम सप्ताह शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सांगितले की, आमदार संजय बनसोडे हे हावगी स्वामी महाराजांवर निष्ठा ठेवणारे व्यक्ती असून हावगी स्वामी मठाच्या विकासासाठी त्यांनी भरपूर निधी दिला आहे. अशा पद्धतीने लोककल्याणाची कामे करत असतानाच, भाविक भक्तांच्या श्रद्धेची ही जपवणूक करणारे संवेदनशील मनाचे नेतृत्व दुर्मिळ झालेले असताना, परमेश्वर कृपेने उदगीर विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी संजय बनसोडे यांच्या रूपाने विकास पुरुष असलेला आमदार लाभला आहे. अशा कर्तबगार लोकनेत्याला माझ्या हाताने विकासरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल मला मनस्वी आनंद होतो आहे.

मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फिरत असतो. मात्र माझ्या आजपर्यंतच्या काळात आमदार संजय बनसोडे यांच्यासारखा धडाडीचा लोकप्रतिनिधी पाहायला मिळाला नाही. त्यामुळेच मला उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेचा अभिमान वाटतो. अशा लोककल्याणाची भावना जपणाऱ्या नेतृत्वाला जनमानसातूनही जपले पाहिजे, असेही सांगितले.

याप्रसंगी बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले की, विकासाच्या कामाला गती देण्याचे काम हे महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते माझ्याकडून करून घेत आहेत. विकासात्मक कामासाठी कोणतेही राजकारण आड न येऊ देता गावच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असतो. कारण या जनतेने मला त्यासाठी निवडून दिले आहे. मी या जनतेचा ऋणी आहे. ते ऋण फेडण्याचा थोडासा प्रयत्न माझ्या हातून होत आहे. याबद्दल मला देखील आनंद होत आहे, असे सांगितले.

About The Author

error: Content is protected !!