हरभरा विक्री साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया सुरु

लाभ घेण्याचे चेअरमन भरत चामले यांचे आवाहन
उदगीर(एल.पी.उगीले) :- येथील स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने नाफेड अंतर्गत हरभरा (चना) खरेदी करण्यात येणार असून ही खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रकियेद्वारे नोंदणी चालू झालेली आहे. तरी शेतकऱ्यानी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत तुकाराम चामले यांनी केले आहे.

हरभरा विक्री साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया सुरु

स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह खरेदी विक्री संघ शेतकऱ्याच्या हितासाठी काम करणारे असून या संघाच्या माध्यमतून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमीका आहे. या संघाच्या माध्यामातून नाफेड अंतर्गत शेतीमाल खरेदी प्रक्रिया वेळोवेळी राबविण्यात येते. सध्या हरभरा (चना) खरेदीची प्रक्रीया चालू होणार आहे. यासाठी शेतकऱ्यानी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीनंतर क्रमानुसार शेतकऱ्याच्या मालाची खरेदी संघामार्फत केली जात आहे. तरी शेतकऱ्यानी या योजनेअंतर्गत चना विक्री साठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करुन आपला माल संघाकडे विक्रीसाठी आणावा, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत तूकाराम चामले यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!