महाराष्ट्रात गद्दारांचा इतिहास लिहीला जात नाही – अंबादास दानवे

महाराष्ट्रात गद्दारांचा इतिहास लिहीला जात नाही - अंबादास दानवे

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : महाराष्ट्रात गद्दारांचा नव्हे ईमानदारांचा ईतिहास लिहीला व वाचला जातो,तोच चिरकाल टिकवलाही जातो.असे विचार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.ते देवणी तालुक्यातील वलांडी येथील कार्यक्रमात बोलत होते.

शिवगर्जनेच्या माध्यमातून ऊद्धव बाळासाहेब ठाकरेंचे विचार गावपातळी पर्यंत पोंहचवण्यासाठी अभियान शिवगर्जनेच्या माध्यमातून चालू असून चिन्ह महत्वाचे नाही, विचार महत्वाचा आहे.

सुर्याजी पीसाळ व खंडोजी खोपडे सारख्या गद्दारांचा ईतिहास महाराष्ट्रात लिहीला जात नाही,ही महाराष्ट्राची परंपरा आहे. गद्दार शासनाची हकालपट्टी झाल्याशिवाय रहानार नाही. असे उद्गार विधानसभा विरोधीपक्ष नेते अंबादास दाणवे यांनी काढले.

या वेळी व्यासपीठावर जिल्हा संपर्क प्रमुख विठ्ठल गायकवाड ,महानगर संपर्क प्रमुख विश्वनाथ स्वामी , लातूर जिल्हा प्रमुख शिवाजी माने , ग्रामीण चे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी , संतोष सोमवंशी, माजी जिल्हा प्रमुख पप्पू कुलकर्णी , नामदेव चाळक, हरिभाऊ सगरे, निलंगा तालूका प्रमुख अविनाश रेशमे , महीला आघाडीच्या जिल्हा संघटक डाॅ. शोभा बेंजरगे, जिल्हा महीला संघटीका सुनिता चाळक , शिरूर अनंतपाळ तालूका प्रमूख भागवत वंगे , देवणी तालूका प्रमुख मुकेश सुडे,शहर प्रमुख दिपक स्वामी,ऊपजिल्हा प्रमुख विनोद आर्य, विष्णू साबदे,युवा सेना अमोल भोसले, उपतालूका प्रमुख लक्ष्मण बिरादार, संजय बिरादार,बालाजी बिरादार , शंकर वळसंगे, उपतालुका प्रमुख,सचिन बिरादार तालुका संघटक,पंडित भंडारे,लाला पालेकर ,वलांडी शाखा प्रमुख राजकुमार कार्ले,गोविंद कार्ले,लहू सुर्यवंशी यांची प्रमुख ऊपस्थीती होती. प्रास्ताविक डाॅ.शोभा बेंजरगे तर आभार बाबूराव शेळके यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!