शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा समारंभ

शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा समारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ व निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती आणि योगी अरविंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ समितीचे अध्यक्ष ऍड शिवाजीराव बिरादार, तसेच मंचावर स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,केंद्रीय समन्वय समितीचे सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, डॉक्टर प्रकाशराव येरमे, चंद्रकांत धनबा, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक बलभीम नळगिरकर, लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले व इयत्ता दहावीला शिकवणारे सर्व वर्ग शिक्षक उपस्थित होते.

आपल्या मनोगतातून वैभव एकंबेकर, प्रज्योत चिखले, ऋषिप्रसाद कन्नाडे,भूमिका वासरे, सायली सावळे या विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्या मनोगतात विष्णू तेलंग,छाया दिक्कतवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. किरण नेमट यांच्या दहावी ब वर्गातर्फे शाळेला भेट देण्यात आली. उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी मनोगतात म्हणाले, भारतातले विद्यार्थी खूप सुसंस्कारित आहेत.ईतर देशातील विद्यार्थ्यांना भारतातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागेल. तुमची ओळख लाल बहादुर शास्त्री विद्यालयाचे विद्यार्थी अशीच जगासमोर होणार आहे. मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड म्हणाले, ” आमचे विद्यार्थी परीक्षेवर स्वार होणारे विद्यार्थी आहेत. कोणत्याही क्षेत्रात जा,पण पुन्हा नक्कीच विद्यालयास भेट द्या ” असे सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे म्हणाले, ” विद्यार्थी देशभक्त पाहिजे.यशाचे शिखर गाठणारे हवे. सत्यम वद, धरमं चर. आत्ताच्या परिश्रमाची फळे आयुष्यभर मिळतील. ” अध्यक्षीय समारोपात ऍड शिवाजीराव बिरादार म्हणाले,” तुमचे मत स्पष्ट मांडा. आपण जेथे जाल तेथे शाळेने दिलेली ज्ञान व संस्काररूपी शिदोरी घेऊन जा.आयुष्यात कधीच कमी पडणार नाही.

या कार्यक्रमाचे संचालन,प्रास्ताविक व परिचय दहावीचे प्रमुख कृष्णा मारावार यांनी, तर आभार व कल्याण मंत्र किरण नेमट यांनी मांडले.

About The Author

error: Content is protected !!