यशवंत विद्यालयात राष्ट्रसंत प.पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात राष्ट्रसंत प.पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा जन्मदिवस उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : वसुंधरारत्न, सद्गुरु, राष्ट्रसंत, प.पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा 107 वा जन्मदिवस यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. प्रारंभी प्राचार्य व्ही व्ही गंम्पले यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विचारपीठावर उप मुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, अशोक पेद्येवाढ, प्रा. शिवशंकर पाटील, अरुण मोरे, शिवानंद भेटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी राम तत्तापूरे यांनी राष्ट्रसंताच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी प्राचार्य व्ही.व्ही. गंपले यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी आभार कपिल बिराजदार यांनी मांनले. या सोहळ्याला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!