महात्मा फुले महाविद्यालय छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजशास्त्रीय विभागप्रमुख डॉ. सतीश ससाणे हे होते तर, डॉ. प्रकाश चौकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी ह. भ.प. प्रो. डॉ. अनिल मुंढे महाराज, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, प्रा. प्रकाश गायकवाड, प्रा. डी. जे. चव्हाण कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
