सामाजिक कार्यकर्ते प्रा.गोविंद शेळके यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न !

सामाजिक कार्यकर्ते प्रा.गोविंद शेळके यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न !

अहमदपूर (गोविंद काळे) : न्यु शॉपिंग सेंटर ,अहमदपूर येथील नवीन इमारत ‘तात्या टावर’ या नूतन निवासस्थानी मराठा सेवा संघ, लातूर जिल्हयाची थिंक टँक विद्रोही विचारांची बुलंद तोफ, शांतचित्त नामा आणि रोखठोक तुका यांच्या अपुर्व वैचारिक संगमातून तयार झालेले जहाल रसायन, ज्यांना प्रति खेडेकर साहेब असं आदराने संबोधले जाते, ते म्हणजे, मराठा सेवा संघ लातूर चे जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री प्रा.गोविंदरावजी शेळके सर यांच्या वाढदिवसानिमित्य छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी व्यासपीठावर सुमनबाई शेळके, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवानंद हेंगणे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.गणेश कदम, एन.डी.राठोड, डॉ.बेरळकर, वर्षाताई गोविंदराव शेळके, डॉ. सतीश पेड आदींची उपस्थिती होती.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब, कार्यसम्राट आमदार बाबासाहेब पाटील साहेब, माजी मंत्री विनायकराव पाटील साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.गणेश कदम, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ता भाऊ गलाले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गोविंदराव गिरी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस इमरोजभाई पटवेकर, युवक नेते डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, डॉ.बेरळकर, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक चापटे सर, प्रा.द.मा.माने, मोहीब कादरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, कवि राजेंद्र कांबळे, महेंद्र खंडागळे, डॉ. सतिश पेड, धनंजय उजनकर, जगदीश जाधव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.विश्वांभर स्वामी सर व संघाची सर्व कार्यकारीणी मंडळ व सदस्य, पत्रकार प्रा. रत्नाकर नळेगावकर, पत्रकार मेघराज गायकवाड, पत्रकार दिनकर मद्देवाड, पत्रकार सुरेश डबीर काका, नगरसेवक अभय मिरकले, चंद्रशेखर भालेराव, रामदास देशमुख, धिरज भंडे, पत्रकार गोविंद काळे, पत्रकार बाबासाहेब वाघमारे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्वच दैनिकांचे पत्रकार बांधव यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, विद्यार्थी व विविध ठिकाणावरून आलेले मान्यवर, पदाधिकारी व शेळके सरांचे चाहते आदीं उपस्थित होते.

या प्रसंगी दत्ताभाऊ कदम, किलबिलचे ज्ञानोबा भोसले, जिजाऊ ब्रिगेडच्या मीनाक्षी जाधव, वैष्णवी शेळके, सामाजिक कार्यकर्ते एन डी राठोड, इमरोज पटवेगर मंचावरील मा.बाळासाहेब जाधव साहेब,विनायकराव पाटील साहेब, डॉ.गणेश कदम, शिवानंद तात्या हेंगणे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची खासियत अशी की, प्रा.गोविंद शेळके सर हेच या कार्यक्रमापासून अनभिज्ञ होते. त्यांना अंधारात ठेवून हा कार्यक्रम शेळके सरांचे विध्यार्थी व चाहत्यांनी आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन संयोजक शिव व्याख्याते शिवशंकर लांडगे, संभाजी ब्रिगेड चे सचिव सिध्दार्थ दापके, व्यावसायिक राम सूर्यवंशी,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष भीमराव नानाभाऊ कदम, अॅड. आनंद जाधव , पत्रकार वीरेंद्र पवार ,दत्ताभाऊ कदम, बागन शेख, हुसेन शेख, माजी सरपंच गोपाळ पाटील, पिंटू पाटील, सौरभ उर्फ चिंटू पाटील, विलास सुर्यवंशी, कैलास सूर्यवंशी, महेश कानगले, अजिंक्यराजे चापटे, मावलगावचे संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, किलबिलचे कर्मचारी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

About The Author

error: Content is protected !!