बालाघाट तंत्रनिकेतन चे घवघवीत यश
अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये बालाघाटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये कम्प्युटर प्रथम वर्षात शिंदे सुमित बालाजी 88.14% गुण घेऊन प्रथम तांबोळकर श्रीगुरु रवीनाथ 82.14% गुण घेऊन दुतीय आला आहे.
कम्प्युटर दुतीय वर्ष मध्ये करणाळे संकेत गोविंद 78.27% गुण घेऊन प्रथम तर ऊपरवाड तिरुपती संजय 76.08% गुण घेऊन दुतीय आला आहे. सिव्हिल विभागातून प्रथम वर्षात पांढरे प्रेरणा बालाजी 83.00 % गुण घेऊन प्रथम तर लातूरे अमरेश्वर लक्ष्मण 75.00% गुण घेऊन दुतीय आला आहे. सिव्हिल तृतीय वर्षात फरकांडे माया बालाजी 85.40% गुण घेऊन प्रथम तर तुरटवाड शिवम सुरेश 83.40% गुण घेऊन द्वितीय आला आहे. इलेक्ट्रिकल प्रथम वर्षात राठोड बालाजी शंकर 81.29% गुण घेऊन प्रथम तर कोने रोहित सिद्राम 78.29% गुण घेऊन द्वितीय आला आहे. इलेक्ट्रिकल द्वितीय वर्षात ठुले शैलेश वैजनाथ 70.63 गुण घेऊन प्रथम तर वाघमारे अविनाश दिनकर ६८.५०% गुण घेऊन द्वितीय आला आहे. मेकॅनिकल प्रथम वर्षात श्रीराम शंकर पवार 79.29% गुण घेऊन प्रथम तर तीर्थे सुरज ज्ञानेश्वर 79.00% गुण घेऊन द्वितीय आला आहे. मेकॅनिकल द्वितीय वर्षात गुट्टे नागेश मधुकर 75.00% गुण घेऊन प्रथम तर जाधव उद्धव माधवराव 74.00% गुण घेऊन दुतीय आला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते भाजपा, गणेश दादा हाके तसेच संस्था सचिव रेखाताई तरडे, संचालक अमरदीप हाके, प्राचार्य स्वप्निल नागरगोजे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
