संधीचं सोनं करण्याची ताकद युवकांनी ठेवावी – गणेश हाके
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रत्येक माणसाकडे संधी चालून येते आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात कित्येक वेळा संधी येते आपण या देशाचे तरुण आहात आलेली संधी सोडू नका प्रत्येक संधीचं सोनं करण्याची ताकद युवकात असते शिक्षणाबरोबर आपल्या अंगी विविध गुण असतात ते गुण बाहेर काढण्याचे योग्य वय आहे त्यामुळे आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाट मोकळी करून द्यावी आपल्या कलेमुळे विविध क्षेत्रात आपल्या देशाची मान उंचावेल असे आपले स्थान निर्माण करा असे मत बालाघाट तंत्रनिकेतन तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन ‘उत्कर्ष- 2023’ या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्था अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते भाजपा, गणेश हाके यांनी मांडले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य स्वप्निल नागरगोजे यांनी मांडताना वार्षिक अहवाल विद्यार्थ्यांची शिक्षणाबरोबर विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व यापुढेही विविध क्षेत्रांमध्ये बालाघाटचे विद्यार्थी नेत्रदीपक यश संपादित करतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर वरून बोलताना संचालक कुलदीप हाके म्हनाले सर्व विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असलेल्या आत्मविश्वासाला तडा जाऊ देऊ नये. प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरत असताना मी गरीब आहे, मी खेड्यातील आहे. असा विचार न करता आत्मविश्वासाने सामोरे जा असे मत व्यक्त केले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात, कला क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या नेतृदीपक यशाबद्दल संस्था अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते भाजपा गणेश हाके यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलात्मक गुण सादर केले याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत गुट्टे ,संचालक अमरदीप हाके, संचालिका शिवालिकाताई हाके, प्राचार्य मदन आरदवाड, प्रा अहमद सर आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तंत्रनिकेतन व आयटीआय मधील सर्व प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. हे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश केंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष लातूरे यांनी मानले.
