पालकमंत्री घरचेच! आमदार घरचेच!! असल्याने काँग्रेस कार्यकर्त्याकडून प्रशासनाच्या आदेशाला कोलदांडा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीणचे आ. धीरज देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, लातूर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र या आयोजनात कोरोना च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने लागू केलेले नियम आणि जमावबंदीचे आदेश त्याला केराची टोपली दाखवत कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी नामास्कचा वापर, ना सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळला गेला.
वास्तविक पाहता जमावबंदीचा आदेश लागू झाल्यानंतर पाच पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ नये,त असे असतानाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने धनेगाव येथील रोकडेश्वर देवस्थान येथे अभिषेक कार्यक्रम आयोजित करून आ. धीरज देशमुख यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
याप्रसंगी 21 शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, प्रताप पाटील, बादल शेख, सरपंच शाम करे, विलास चामले, ईश्वर इंगळे, बाबुराव कापसे, संदिपान कांबळे, शिवदास बोंबीलवाड, अमोल कांबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसामान्य माणसांना काटेकोर नियम लागू केले जात असून त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. मात्र येथे पालकमंत्री घरचेच! आमदार घरचेच!! असल्याने सामाजिक हितापेक्षा आपल्या नेत्यावर आपले किती प्रेम आहे? हे दाखवण्यासाठी केलेली चढाओढ येथे पाहायला मिळते. वास्तविक पाहता सर्व ठिकाणचे मंदिर, देवस्थाने, मज्जिद बंद असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धनेगाव येथील रोकडेश्वर देवस्थान येथे जाऊन अभिषेकाचा कार्यक्रम केलाच कसा? असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.