जिल्ह्यात 1010 कोरोनाबाधित रुग्ण

जिल्ह्यात 1010 कोरोनाबाधित रुग्ण

8 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात 1010 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 8 रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1973 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 289 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 2957 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 721 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 39149 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 7468 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 793
रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 30880 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 382 आहे. आरटिपीसीआर मधील 648 अहवाल प्रलंबित आहेत.

About The Author