कल्लूर येथील पांडूरंग विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ

कल्लूर येथील पांडूरंग विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील कल्लूर येथील श्री पांडूरंग विद्यालयात शनिवारी स्वयंशासन दिन व इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष गोविंदराव केंद्रे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टे, संस्था सचिव विनायकराव बेंबडे, महाराष्ट्र कापूस फेडरेशनचे मराठवाडा विभागाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, बापूसाहेब कज्जेवाड, दिलीपराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून साक्षी संजय गायकवाड, उपमुख्याध्यापक म्हणून प्रगती धनाजी आमगे तर पर्यवेक्षक म्हणून तुळशीराम भास्कर घुगे यांनी काम पाहिले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टे म्हणाले, जे विद्यार्थी आई-वडील आणि गुरूंचे ऐकतात ते जीवनात खूप मोठे होतात. तुम्ही ही आई-वडील व गुरुंचे ऐका व अभ्यास करून उज्वल यश संपादन करा. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. व्ही. नादरगे यांनी केले.सुत्रसंचालन पी. बी. देवकत्ते यांनी तर आभार डी. पी. केंद्रे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!