आरोग्य सेविका सौ.मनिषा मुरलीधर बेडगे (लामतूरे) यांनां छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार

आरोग्य सेविका सौ.मनिषा मुरलीधर बेडगे (लामतूरे) यांनां छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील मौजे करडखेल येथील मूळच्या रहिवासी आणि सद्यस्थितीत औरंगाबाद ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक पैठण येथील आरोग्य सेविका व स्वराज्य देशा सह- संचालिका सौ.मनिषा बेडगे (लामतूरे) करडखेलकर यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.औरंगाबाद वैजापूर येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या तर्फे दरवर्षी दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2023 साठी आरोग्य सेविका सौ.मनिषा बेडगे (लामतूरे) यांनी कोरोना काळात स्वतः च्या परिवाराची काळजी न करत जी जनतेची सेवा केली.अनेक रक्तदान शिबिर,आरोग्य रक्षणासाठी ठीक ठिकाणी मोफत आरोग्य शिबाराचे आयोजन केले.समजातील प्रत्येक सामाजिक आरोग्य विषयी कार्यक्रमात उपस्थित राहुन सहकार्य केले.पैठणकरांची सेवा करण्यात त्याचे मोलाचे योगदान आहे. घरो घरी जाऊन आरोग्य विषयी माहिती व घरपोच औषध तसेच घरोघरी लसीकरण मोहीम हाती घेऊन सर्व पैठणकरांची एक प्रकारची सेवा व आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिल्या.त्याचबरोबर स्वराज्य देशा पेजवरून सर्व महाराष्ट्रातील जनते पर्यंत नामवंत वाचारवंताद्वारे समाजप्रबोधनाचे कार्य केले.घर बसल्या ज्ञान देण्याचे कार्य ही त्यांनी केले. संत एकनाथ महाराज पालखी सोहळा पंढरपूर पर्यंत आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले.

त्यांच्या आरोग्य विषयक आणि सामाजिक कार्याची दखल आयोजक सुर्यकांत रामदास मोटे पोलीस पाटील तथा पोलीस सचिव म.रा.गा.का.पोलिस पाटील संघ जिल्हा सचिव औरंगाबाद यांनी निवड करून निवडपत्र दिले.

RHTC पैठण चे मार्गदर्शक डॉक्टर चव्हाण ,डॉ. किल्लारीकर, डॉ.सिमा साळवे मॅडम, डॉक्टर अदुरकर मॅडम, डॉक्टर भावठाणकर मॅडम,डॉक्टर वैशाली मॅडम, डॉक्टर सविता मॅडम ,डॉक्टर शुभदा मॅडम ,ह.भ.प.रघुनाथ बुआ गोसावी (गुरू), ह.भ.प.योगेश रघुनाथ बुआ गोसावी महाराज संत एकनाथ महाराज पालखीवाले , तहसिलदार संतोष अनारथे , रेखाताई कुलकर्णी उपाध्यक्ष महाराष्ट्र महिला मोर्चा,कुलदिप कामशेट्टी , दैवशाला लामतूरे,पोलिस निरीक्षक प्रताप लामतूरे,प्रा.प्रशांत लामतूरे,यांच्या बहुमोल मार्गदर्शना बद्दल आणि आरोग्य सेविका स्वाती क्षीरसागर, पाठक सिस्टर ,मुंडे सिस्टर ,आढाव सिस्टर,स्वप्निल साळवे,संत एकनाथ महाराज मंदीर ट्रस्ट, पत्रकार संघ पैठण आणि स्वराज्य देशा पेजचे संचालक मुरलीधर बेडगे , शिवाजी बेडगे, संदिप लामतूरे,सचिव व्यंकट होनाळे, सहसचिव रुपालीताई पाटील, शिवव्याख्याते अक्षय लोखंडे,बाल शिवव्याख्याते साहिल बरकले,मनोज लामतूरे,नंदू लामतूरे,कल्पना लामतूरे, गणेश जाधव, संतोष पालवे,पोपट मरकड, विनोदकुमार यादव, रामराव अनंमवाड, कमलेश जगताप,तानाजी बुरले, गोपाळ हालसे यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले.

About The Author

error: Content is protected !!