जनतेच्या दरबारात गद्दारांना सजा आणि निष्ठावंतांना न्याय मिळेल – अंबादास दानवे

जनतेच्या दरबारात गद्दारांना सजा आणि निष्ठावंतांना न्याय मिळेल - अंबादास दानवे

उदगीर (एल.पी.उगीले) : गद्दार आणि शिवसेनेचे नाव पळवले, शिवसेनेचे धनुष्यबाण पळवले. असे असले तरीही जनमानसाच्या मनामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल निष्ठा आणि प्रेम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेवर खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या शिवभक्ता कडून या गद्दारांना धडा मिळेल. तसेच शिवसेनेचे खरे हक्कदार यांना न्याय मिळेल. अशी आशा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. ते हेर येथे शिवसंवाद यात्रे दरम्यान शिवगर्जना सभेच्या वेळी बोलत होते.

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुढे बोलताना सांगितले की, शिवसेना पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह चोरणाऱ्या आमदार, खासदारांना उद्देशून बोलताना जनतेला सांगितले की, ज्यांच्या गळ्यात शिवसेना नाव आणि चिन्हं असलेला गमच्या दिसेल त्यांच्या पासून सावध रहा. त्यांची ओळख चोरांची झाली आहे, त्यांनी शिवसेना पक्षाच नाव चोरल, शिवसेना पक्षाच चिन्ह धनुष्यबाण चोरल, पक्ष चोरला, चिन्ह चोरल, बाप चोरला या गद्दार चोरट्या पासून सावध रहा, अधर्माच्या धनुष्याला धर्माची साथ मिळेल. अशी भावना व्यक्त केली. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख विठ्ठलराव गायकवाड, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, जिल्हाप्रमुख शिवाजीराव माणे, संभाजीनगरचे शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, महिला जिल्हा संघटक सुनिताताई चाळक, डॉ. शोभाताई बेंजरगे यांची उपस्थिती होती.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व गावखेड्यात शिवसंवाद यात्रे निमित्त शिवगर्जना सभेच्या माध्यमातून शिवजागर करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जाहीर सभेत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, या गद्दारांना मी आवाहन करतो की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन निस्वार्थ घडलेल्या शिवसैनिकांची या राज्यात कमतरता नाही, गावा गावात ज्वलंत शिवसेना आहे.ती गद्दारांनी पहावी, हार तुरे घेऊन शिवसैनिक स्वागतासाठी वाट पहात बसले आहेत, या महाराष्ट्राचं नेतृत्व करणं सोपं काम नाही, या गद्दारांना धनुष्यबाणा प्रमाणे नेतृत्व पेलवणार नाही. उद्धवजी ठाकरे यांनी ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्या दिवशी महाराष्ट्रातील माय मावल्यांनी भरल्या डोळ्यांनी हळहळ व्यक्त केली. त्या माय माउल्यांचा तळतळाट या गद्दारांना लागल्या शिवाय राहणार नाही. महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री मिळाले पण कोरोना काळात उद्धवजी ठाकरे यांचे काम पाहून देशात एक नंबरचे मुख्यमंत्री ठरले. त्यावेळी जनतेने त्यांना कुटूंब प्रमुख अशी उपाधी बहाल केली, अनेक राज्यांत मृतदेह पाण्यावर तरंगत होते, आपल्या महाराष्ट्रात सर्व रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली. मयत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, त्यावेळी पहिली घोषणा शेतकरी हिताची घेतली. दोन लाख रुपया पर्यंतची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात एक अंगठ्याच्या ठश्यावर थेट कर्जमुक्ती देणारं महाराष्ट्र राज्य पहिलं ठरलं, फडणविसांनी यासाठी अनेक कागदपत्रे सादर करायला भाग पाडले होते, त्यापेक्षा अतिवृष्टीत झालेले नुकसान व कर्जमुक्ती सरळ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून न्याय मिळवून दिला. मागील अतिवृष्टीत झालेली नुकसान भरपाई, भरलेला विमा, त्यावरची नुकसान भरपाई, प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये आज पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. सध्या राज्यात कांदा कवडीमोल भावाने विक्री केला जात आहे, बार्शी येथील शेतकऱ्याला ५१३ किलो कांद्याचे दोन रुपये चेक द्वारे मिळाले, जगात कांदा मिळत नाही, केंद्र सरकार निर्यात बंदी उठवत नाही, गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांने पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आत्महत्या केली, सध्या कांदा उत्पादक शेतकरी शेतीवर नांगर फिरवून रडत आहे, शेतकऱ्यांना क्रिडीट कार्ड देणार अशी घोषणा केली मात्र प्रत्यक्षा क्रिडीट कार्ड दिली नाहीत. त्या खात्यावर दिड लाख रुपयांची रक्कम दिली नाही, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग कधी लागू केला नाही, शेतकऱ्यांना कधी न्याय मिळवून देणार आहेत? याला केंद्र सरकार जबाबदार आहे. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून देशातील गरीबांना गॅस देणारं, किती लोकांना गॅस दिले,ज्यांना दिले ते गॅस सिलिंडर खरेदी करु शकत नाहीत. ३५५ चा सिलिंडर ११०० रुपये, खाद्यतेल १४०, पेट्रोल ११५, डिझेल ९४ सर्वत्र महागाई अब की बार मोदी सरकार मोदींना मत महागाईला मत अशी अवस्था झाली आहे. सध्याच सरकार खोके सरकार आहे .महाराष्ट्र राज्यातील गाव खेड्यात या खोके सरकारची घोषणा दिली जाते, पन्नास खोके एकदम ओके त्यांनी गद्दारी कशासाठी केली मराठा मुख्यमंत्री करण्यासाठी केली अशी वल्गना मंत्री करत आहेत. त्यांना आम्ही सांगतो मराठा माती खात नाही, मराठा कधीही गद्दारी करु शकत नाहीत, मराठा स्वाभिमानी आहे, मराठा म्हणजे जाती जातीत फूट पाडणारे असू शकत नाहीत, छत्रपती शिवरायांच्या भुमित, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमित जन्माला आलेला माणूस त्यांचे विचार, त्यांचा वारसा घेऊन पुढे जातो. गद्दारांनी जातीवर बोलू नये. मराठा निष्ठावंत असतो, शिवरायांच्या मुठभर मावळ्यांनी स्वराज्य स्थापन केले आम्ही त्यांना आदर्श मानतो, हे गद्दार सांगत आहेत. आम्ही हिंदूत्व सोडून काॅंग्रेस, राष्ट्रवादी सोबत यूती केली हिंदूत्व म्हणजे काय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच व्यापक हिंदूत्व जोपासलं आहे, शेंडी जाणव्याच हिंदूत्व आम्ही नाही स्वीकारलं आणि स्विकारणार नाही. या देशात जे लोक राहतात आणि देशाशी गद्दारी करतात त्यांना आम्ही गाढणार हे आमच हिंदूत्व आहे, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्योतिर्लिंगाचा विकास करण्यात आला आहे. गद्दारांनी पाहावं हिंदूत्व म्हणजे जाती जातीत, धर्मा धर्मात भांडणं लावणे,दंगे घडवणे हे हिंदूत्व आहे का? असा सवाल करत आम्ही शिवसंवाद यात्रे दरम्यान ग्रामीण भागातील गावा गावात जाऊन शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचे हिंदूत्व जागवणार आहोत. ज्या दिवशी या गद्दारांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. याचा राग व्यक्त करायचा आहे, शिवसेना नाव, चिन्ह धनुष्यबाण आपल्या कडून दिवसा ढवळ्या चोरुन घेतल याचा बदला घ्यायचा आहे. या अधर्माला धर्माची लोक मतदानरुपी आशीर्वाद देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा असे आवाहन केले.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, माजी जिल्हाप्रमुख पप्पूभाई कुलकर्णी, मैनाताई साबणे, जिल्हा संघटक गजानन होनराव, उपजिल्हा प्रमुख नंदकुमार पवार,भारत सांगवीकर, प्रकाश हैबतपुरे,अंगद पवार,जळकोटचे तालुका प्रमुख मन्मथ बोधले, चाकुरचे तालुका प्रमुख दिलीप पाटील,युवासेना जिल्हा प्रमुख राहुल मातोळकर,उदगीर शहर प्रमुख मुन्ना पांचाळ,उपतालुका प्रमुख महेश फुले, उपतालुका प्रशांत पाटील,उपतालुका प्रमुख मिथुन वाडीकर, शिक्षक सेनेचे तातेराव मुंढे,व्यंकट साबणे,दिनेश पाटील, श्रीमंत सोनाळे चंद्रकांत टेंगटोल,शैलेश वडगावे, रमण माने,विशाल कांबळे,राजुरचे तालुका संघटक प्रा. संतोष रोडगे,शरद सावरे,बन्सीलाल कांबळे, नगरसेवक संदीप चौधरी, श्रीकांत कोंपले,उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी,शहर प्रमुख शिवा कासले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली देवकत्ते,अरुणाताई लेंडाने, अल्का ताई चंदेल, रेखा नाईक, संगीता मंगदाळे, सुरेखा अडके, सुजाता तांबे ईत्यादी महिला आघाडीच्या महिला उपस्थित होत्या, उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे, पप्पू येवंदगे,हरी गुराळे, गणपत वाघमारे, धोंडीराम जाधव, अमोल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, जनक जाधव, मारोती जाधव संदीप मोरे, मनोज फुले, गोविंद जाधव, भाऊसाहेब भंडे, गोविंद हंगरगे, वसंत जाधव, प्रदीप पाटील, अंकुश हुरसनाळे, लक्ष्मण पाटील, नवनाथ शिंदे सह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख कैलास पाटील,माजी पंचायत समिती सदस्य गोविंद कोंपले, तालुका संघटक बालाजी पुरी, सर्कल प्रमुख सखाराम गुराळे, राम घोगरे शाखा प्रमुख आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!