श्यामलाल हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये दि.27 फेब्रुवारी हा दिन मराठी राजभाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्र. उप. मु. बालाजी चव्हाण, प्र. पर्यवेक्षक राहूल लिमये यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच जेष्ठ शिक्षिका ऐतनबोने शीलन, रणमले सरशा, इंद्राळे रेखा, जेठुरे शितल यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची थोरवी व महत्त्व आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले,मराठी भाषेतील प्रभावी कविता, चारोळ्या,म्हणी इ. साहित्याचे प्रभावीरीत्या सादरीकरण केले.
अध्यक्षीय समारोपामध्ये मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी मराठी भाषेची थोरवी, महत्व आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले, व सर्वांनी मराठी भाषेचे संवर्धन व जतन करावे. यासंबंधी मार्गदर्शन केले. श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. मराठी भाषा ही समृद्ध अशा साहित्याने ओतप्रोत भरलेली आहे. या साहित्याचे वाचन व संवर्धन आपण सर्वांनी करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव हाके यांनी केले तर ऐतनबोने शीलन यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी बसवराज, उमाकांत सूर्यवंशी, वनकुंद्रे प्रदीप यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
