मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे – उपक्रमशील शिक्षक राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन.
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी भाषा ही सर्व भाषांपेक्षा रसाळ, गोड ,लागवी भाषा असल्याचे सांगून तिचे जतन आणि संगोपन करण्यासाठी घराघरातून, समाजातून, शाळेतून, महाविद्यालयातून, आणि विविध शासकीय कार्यालयातून या भाषेचा जाणीवपूर्वक वापर करून मराठी भाषेला राज भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे असे आग्रही प्रतिपादन यशवंत विद्यालयाचे मराठी विषयाचे विभाग प्रमुख राम तत्तापुरे यांनी केले. ते दि. 27 रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने यशवंत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मार्गदर्शन प्रसंगी बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही व्ही गंपले, उप मुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, परवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप प्राचार्य व्ही व्ही गंपले यांनी केला. प्रारंभी प्राचार्य यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी तर आभार दीपक हिंगणे यांनी मांनले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
