जिद्द हीच यश मिळविण्याची खरी गुरुकिल्ली – बी.बी नागरवाड
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्या वर्धिनी हायस्कूल मराठी व इंग्रजी माध्यम उदगीर या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.बी नागरवाड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासाचे योग्य नियोजन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीचा अवलंब न करता आपल्या बुध्दीचा पुरेपूर वापर करत वेळेचे नियोजन करून कुठल्याही प्रकारचा तान तनाव न घेता यश मिळवावे. त्यासाठी प्रथमतः वेळेचे नियोजन, योग्य आहार, योग्य मार्गदर्शन व स्वतःमध्ये असलेली जिद्द हीच यश मिळवण्याची खरी गुरुकिल्ली आहे,असे प्रतिपादन मुख्याध्यापक बी.बी नागरवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी प्राथमिक इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सुप्रिया जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बी.बी नागरवाड,सी.व्ही पाटील, आर.डी पटवारी,शोभा पाटील, वैजयंती पाटील,प्रीती कांबळे, योगेश पाटील,आर.बी गुळंगे यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलाने करण्यात आली.या निरोप समारंभ प्रसंगी आशिया सय्यद,श्रेया वाडीकर,स्नेहा खरटमोल, संजना चौधरी, शेख यामीन,असीम शेख इत्यादी विद्यार्थ्यांनी गुरुजना बद्दल, शाळेबद्दल विचार मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक एन.आर जवळे, अमोल मुळे, महेश बाजुळगे, कलावती आपटे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जारा यांनी केले तर आभार आर.बी गुळंगे यांनी मानले.
