अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 4 जनाविरुद्ध गुन्हा दाखल

2 ट्रॅक्टरसह 10 लाख 10 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : जिल्हा भरात अवैध वाळूचे उत्खनन करून गौण खनिजाची कर बुडवेगिरी, तसेच अवैध वाळू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची बातमी प्रसिद्धी माध्यमांनी प्रशासनाच्या नजरे समोर आणल्यानंतर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन, पोलीस प्रशासनाला अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी सुचित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने निलंगा तालुक्यात वाळू उत्खनन करणाऱ्या चौघाविरुद्ध गुन्हे दाखल केले असून दोन ट्रॅक्टर सह दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल ही जप्त केला आहे.

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 4 जनाविरुद्ध गुन्हा दाखल

याबाबत माहिती अशी की, पोलीस ठाणे निलंगा हद्दीतील कोतल शिवणी जवळील ओढ्यावर काही लोक बेकायदेशीर, बिगरपरवाना वाळू उत्खनन करून गौण खनिजाची चोरी करून वाहतूक करीत आहेत. अशी माहिती मिळाली त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक बनवून धडक मोहीम राबविण्यात आली. दरम्यान कोतल शिवनी येथे ओढ्याच्या पुलावर दोन ट्रॅक्टर वाळू भरून येत असताना दिसले.त्यांना थांबवून त्यांचे नाव विचारल्यास त्यांनी त्यांची नावे नंदकुमार विठ्ठल सुतार ,(वय 35 वर्ष, धंदा ट्रॅक्टर चालक), चंद्रकांत गोविंद वाघमारे ,(वय 40 वर्ष, ट्रॅक्टर मालक),गोविंद गणपती आयतनबोने,( वय 45 वर्ष, ट्रॅक्टर चालक.), निळकंठ माधवराव डोंगरे, (वय 38 वर्ष, ट्रॅक्टर मालक.सर्व राहणार कोतल शिवनी तालुका निलंगा) असे सर्वजण ओढ्यातून ट्रॅक्टरच्या साह्याने ओढ्यातील गौण खनिज वाळू उत्खननाचा कोणताही परवाना नसताना, वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाळू उत्खनन करून, शासनाचा महसूल बुडवून वाळूची चोरी करून वाहतूक करीत असताना चोरलेली वाळू व वाहनासह 10 लाख 10 हजार रुपयाच्या मुद्देमालासह मिळून आल्याने त्याचेवर पोलीस ठाणे निलंगा येथे कलम 379, 34 भारतीय दंड विधान संहिता सह 48 (7 )(8 ) गौण खनिज कायदा 2013 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे निलंगा हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशाने अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा डॉ. दिनेश कोल्हे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे,राजू मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, नितीन कटारे, नकुल पाटील यांनी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!